हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी जयराम ठाकूर विराजमान

वृत्तसंस्था
बुधवार, 27 डिसेंबर 2017

सलग पाचवेळा आमदार राहिलेले जयराम ठाकूर हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील हे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेरज विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाल्याने त्यांच्या जागी जयराम ठाकूर यांचे नाव चर्चेत आले होते.

शिमला : भाजप नेते जयराम ठाकूर आज (बुधवार) मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. राज्यपाल आचार्य देव व्रत यांनी ठाकूर यांच्यासह इतर दहा जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ठाकूर हे हिमाचल प्रदेशचे सहावे मुख्यमंत्री असतील. 

शिमल्यातील रिज मैदान येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांतील मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.  

सलग पाचवेळा आमदार राहिलेले जयराम ठाकूर हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील हे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेरज विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाल्याने त्यांच्या जागी जयराम ठाकूर यांचे नाव चर्चेत आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी विधिमंडळ नेतेपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांच्यासह 10 जणांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.   

Web Title: marathi news national politics Jai Ram Thakur takes oath as Himachal Pradesh chief minister