कोळसा घोटाळाप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा दोषी

Madhu Koda
Madhu Koda

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यासह अन्य तिघेजण कोळसा घोटाळाप्रकरणी दोषी आढळले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने बुधवारी या सर्वांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणाचा युक्तिवाद उद्यापासून (गुरूवार) सुरु होणार आहे. 

यूपीए सरकारच्या काळात कोळसा घोटाळा झाला होता. अनियमित कोळसा खाणींच्या कंत्राटांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये कोडा आणि माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात येत होता. अखेर याप्रकरणात कोडा, गुप्ता यांच्यासह झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोक कुमार बसू आणि आणखी एकाला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशार यांनी सांगितले, की झारखंडच्या राजहारा उत्तर कोळसा ब्लॉकमध्ये कोळसा वाटप प्रक्रियेत अनियमितता असल्याने न्यायालयाने यासंबंधितांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. 

याप्रकरणी कोडा, गुप्ता, ए. के. बसू यांच्यासह 8 आरोपींना काही दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आल्यानंतर त्यांना जामीन मंजूर केला असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, कोडा यांच्यासह यातील दोषींना न्यायालयाकडून काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com