संयुक्त जनता दलाचे खासदार विरेंद्र कुमार यांचा राजीनामा

veerendrakumar
veerendrakumar

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव आणि अली अन्वर यांना अपात्र ठरवल्यानंतर त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार विरेंद्र कुमार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संयुक्त जनता दलाच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या 3 ने कमी होणार आहे.

बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस महागठबंधनचा पाठिंबा नाकारत भाजपशी घरोबा केला आणि राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. नितीशकुमारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शरद यादव आणि अली अन्वर यांनी निषेध केला होता. त्यानंतर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत त्यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रस्ताव संयुक्त जनता दलाकडून देण्यात आला. त्यानंतर शरद यादव आणि अली अन्वर या दोघांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. 

त्यानंतर आता केरळ संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार विरेंद्र कुमार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. ते म्हणाले, ''मी आपल्या खासदारकीचा राजीनामा राज्यसभा सभापती वेंकय्या नायडू यांच्याकडे दिला आहे. नियमाप्रमाणे मी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षाचा सदस्य आहे. मात्र, त्यांनी आता संघ परिवाराचा अजेंडा हाती घेतला आहे. मी हे स्वीकारू शकत नाही. म्हणून मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देत आहे''.  

दरम्यान, येत्या काळात मी कोणत्याही राजकीय पक्षाची स्थापना करणार नाही. मी केरळला आता परत जाणार असून, माझ्या लोकांमध्ये राहणार आहे. त्यांना लागणाऱ्या गरजा पुरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे विरेंद्र कुमार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com