...म्हणून 'आप'चा कुमारवर 'विश्वास' नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

''ज्या पद्धतीने दिल्लीतील आप सरकार पाडण्याचे संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले. त्याचे केंद्र कुमार विश्वास होते. या षड्यंत्रादरम्यान सर्वाधिक बैठक कुमार विश्वास यांच्या निवासस्थानी झाल्या होत्या''

- आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते गोपाळ राय

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. मात्र, यामध्ये कुमार विश्वास यांना उमेदवारी देण्यात आली नाही. यावर आज 'आप'कडून स्पष्टीकरण देण्यात आले. ''कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही'', असे  'आप'कडून सांगण्यात आले. 

आम आदमी पक्षाला राज्यसभेसाठी तीन जागा देण्यात येणार आहेत. यासाठी पक्षाकडून कोणाला उमेदवारी देण्यात याकडे लक्ष लागले होते. कुमार विश्वास यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ऐनवेळी पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारत सुशील गुप्ता, संजय सिंह आणि नारायण दास गुप्ता यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कुमार विश्वास यांनी यावर उघड नाराजी व्यक्त केली होती.  

आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री गोपाळ राय यांनी कुमार विश्वासबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, ''ज्या पद्धतीने दिल्लीतील आप सरकार पाडण्याचे संपूर्ण षड्यंत्र रचण्यात आले. त्याचे केंद्र कुमार विश्वास होते. या षड्यंत्रादरम्यान सर्वाधिक बैठक कुमार विश्वास यांच्या निवासस्थानी झाल्या होत्या. आपचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तीला राज्यसभेवर कसे पाठवले जाऊ शकते'' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

दरम्यान, उमेदवारी न मिळाल्यानंतर सत्य सांगण्याची शिक्षाच मला मिळाली आहे, अशी भावना कुमार विश्‍वास यांनी व्यक्त केली होती. 

Web Title: marathi news national politics kumar vishwas try to demolish aap government