कर्नाटक लवकरच काँग्रेसमुक्त होईल : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

काही प्रकरणात काँग्रेस नेते काही प्रकल्पांसाठी कमिशनची मागणी करत आहेत. कर्नाटकातील सत्ताधारी सरकारला 10 टक्के सरकार म्हणून ओळखले जात आहे. कारण 10 टक्के कमिशनशिवाय कोणतीही कामे होत नाहीत. सध्या काँग्रेस एग्झिट गेटवर आहे. ते लवकरच बाहेर पडेल.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

नवी दिल्ली : ''सध्या कर्नाटकात कमिशनशिवाय कोणतीही कामे केली जात नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार कमिशन घेणारे सरकार म्हणून ओळखले जात आहे. हे सरकार लवकरच काँग्रेसमुक्त होईल'', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला. 

Narendra modi

बंगळुरुतील पॅलेस ग्राऊंड येथील एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही जाहीर सभा घेण्यात आली होती. भाजपकडून 'प्रवास-नवीन कर्नाटक स्थापन करण्याचा' रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली 90 दिवसांची असणार आहे. 

siddaramaiah

पंतप्रधान म्हणाले, भाजप सरकार विकासाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, काँग्रेसकडून भ्रष्टाचार, जातीयवाद, लांगूनचालन आणि वंशवाद केला जात आहे. काँग्रेस नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. काही प्रकरणात काँग्रेस नेते काही प्रकल्पांसाठी कमिशनची मागणी करत आहेत. कर्नाटकातील सत्ताधारी सरकारला 10 टक्के सरकार म्हणून ओळखले जात आहे. कारण 10 टक्के कमिशनशिवाय कोणतीही कामे होत नाही. सध्या काँग्रेस एग्झिट गेटवर आहे. ते लवकरच बाहेर पडेल, असेही ते म्हणाले.

Web Title: Marathi News National Politics Narendra Modi BJP Karnataka Congress