गुजरातमध्ये 'जबरदस्त' निकाल लागेल.. बघाच! : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मागील 22 वर्षांत राज्यातील फक्त 5-10 लोकांचा फायदा केला आहे. सामान्य नागरिकांना याचा कोणताही फायदा झाला नाही. सरकारने जनतेला जे पाहिजे ते दिले नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) केली.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मागील 22 वर्षांत राज्यातील फक्त 5-10 लोकांचा फायदा केला आहे. सामान्य नागरिकांना याचा कोणताही फायदा झाला नाही. सरकारने जनतेला जे पाहिजे ते दिले नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) केली.

अहमदाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, राज्यात वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये मागितले जातात. परिणामी बहुसंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. नॅनो प्रकल्पासाठी 33 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. मात्र, गुजरातच्या जनतेला यामधून काहीच मिळाले नाही. 

निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बोलत होते. मात्र, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांचे भ्रष्टाचारप्रकरण समोर आल्यानंतर मोदी आता कधीही भ्रष्टाचाराचा मुद्यावर बोलत नाहीत. तसेच मोदी किंवा रुपाणी यांच्यापैकी कोणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उघडपणे बोलत नाहीत. सध्या अनियमित आर्थिक धोरण आहे. निवडणुकांपूर्वी देशातील 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन  त्यांनी दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही.

जीएसटी, नोटाबंदीवर बोलताना ते म्हणाले, नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या निर्णयामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मूळ प्रश्नावरून लक्ष हटवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला गेला.

तसेच ते पुढे म्हणाले. पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांकडे कद्यापि दुर्लक्ष केले जाणार नाही. अय्यर यांच्यावर काय कारवाई केली ही आपण पाहिलीच आहे. मात्र, पंतप्रधान मोदी मनमोहनसिंग यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. मनमोहनसिंगही पंतप्रधानपदी होते. त्यामुळे त्यांच्याबाबत तसे बोलायला नको होते. 

दरम्यान, पहिल्या टप्प्यात आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे. गुजरातमध्ये 'जबरदस्त' निकाल लागेल. गुजरातसाठी आमचे व्हिजन तयार आहे. राज्यातील जनतेसाठी हेल्थ सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. तसेच राज्यात जे काय निर्णय घेतले जातील, ते लोकांना विचारून घेतले जातील, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची राजकीय पद्धत बदलणार : राहुल गांधी

काँग्रेसची सध्याची राजकीय पद्धत आणि विचारसरणीत बदल केला जाणार आहे. मोदी माझ्याविरोधात काहीही बोलतात. मात्र, मी त्यांच्याविरोधात काहीही वाईट बोलणार नाही.   

Web Title: marathi news national politics rahul gandhi attack on Prime Minister Narendra Modi And BJP Gujrat Election