शरद यादव फेब्रुवारीत करणार नव्या पक्षाची घोषणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून शरद यादव नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे सांगितले जात होते. आता त्यांच्याकडून नव्या पक्षाची स्थापना फेब्रुवारीत करणार असल्याचे सांगण्यात आले. 

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अपात्र ठरविल्यानंतर त्यांच्याकडून आता नव्या पक्षाची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करणार केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.  

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून शरद यादव नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे सांगितले जात होते. आता त्यांच्याकडून नव्या पक्षाची स्थापना फेब्रुवारीत करणार असल्याचे सांगण्यात आले. 

''आम्ही सुचवलेल्या नावांसाठी निवडणूक आयोगाच्या परवानगीची वाट पाहत आहोत'', असे शरद यादव यांचे निकटवर्तीय आणि संयुक्त जनता दलाचे सरचिटणीस अरुण श्रीवास्तव यांनी सांगितले. ''आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन-चार नावांची यादी दिली आहे. त्यामध्ये समाजवादी जनता दल, अपना जनता दल आणि लोकतांत्रिक जनता दल अशी नावे सूचवली आहेत. त्यामुळे या नावांपैकी निवडणूक आयोग कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करते, त्यानंतर पुढील दिशा समजेल''.  

तसेच आम्ही नव्या पक्षासाठी एक चिन्ह घेणार आहोत. ते शेतकऱ्यांशी संबंधित किंवा त्यामध्ये कृषी पार्श्वभूमी असावी, असा आमचा विचार आहे. मात्र, याबाबतची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. 

दरम्यान, राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी यादव यांना अपात्र घोषित केल्यानंतर त्यांनी याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

Web Title: Marathi News National Politics Sharad Yadav will announces their party nemes