मोदींना जय शहाप्रकरणी प्रश्न विचारा : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

मी भगवान शिवचा भक्त आहे. ते जे काही सांगतिले त्यांना सांगू दे. माझी सत्य माझ्यासोबत आहे. 

नवी दिल्ली : "तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॅफेल करार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावर होणाऱ्या आरोपावर त्यांना प्रश्न का विचारत नाही, असे सांगून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न केला. एका उद्योगपतीची मदत करण्यासाठीच मोदींनी रॅफेल करार केला असा आरोपही त्यांनी केला.

अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे संचालक असलेल्या कंपनीचा 80 टक्क्यांनी वाढ कोट्यवधींवर गेला आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात होती. जय शहा यांच्याबाबत त्यांचे पिता आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह का गप्प आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदीही यावर कोणतेही भाष्य का करत नाहीत. तसेच अमित शहा यांच्या पु्त्राबाबत माध्यमांकडून प्रश्न का विचारला जात नाही. तुम्ही लोक जो प्रश्न मला विचारता त्याचे उत्तर मी देतो. मग तुम्हीही त्यांना प्रश्न का नाही विचारत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

यापूर्वी विविध मंदिरात यात्रांविषयी, ते म्हणाले, मी भगवान शिवचा भक्त आहे. ते जे काही सांगतिले त्यांना सांगू दे. माझी सत्य माझ्यासोबत आहे. 

पुढे ते म्हणाले, हिंदुस्तानचा अर्थ इज ऑफ डुइंग बिजनेस नाही. नोटाबंदी आणि जीएसटीने देशाला अडचणीत आणले. मोदींनी एक नाव सांगावे ज्यांना कारागृहामध्ये टाकले आहे. विजय मल्ल्या बाहेर इंग्लंडमध्ये मजा घेत आहे. तसेच ते मागील तीन वर्षांपासून सत्तेत आहे. त्यांनी स्वीस बँकेच्या किती खातेदारांना तुरुंगात पाठवले.  

Web Title: marathi news national rahul gandhi criticize narendra modi