पंचकुला येथील हिंसाचारात 126 कोटींचे नुकसान

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

राज्यातील सर्व जिह्यातील मिळून एकूण 126 कोटी 68 लाख 71 हजार 700 रुपयांचे नुकसान झाले होते. यातील अंबाला येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये 46 कोटी 84 लाखांचे नुकसान झाले होते.    

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार माजला. या हिंसाचारात हरियानाचे तब्बल 126 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

गुरुमीत राम रहिमला बलात्कारप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजला होता. हा हिंसाचार बाबा राम रहिमची दत्तक कन्या हनीप्रितने पैसे देऊन घडवून आणल्याचे समोर आले होते. या हिंसाचारादरम्यान सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते. राज्यातील सर्व जिह्यातील मिळून एकूण 126 कोटी 68 लाख 71 हजार 700 रुपयांचे नुकसान झाले होते. यातील अंबाला येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये 46 कोटी 84 लाखांचे नुकसान झाले होते.    

तसेच फतेहबाद येथेही सुमारे 14 कोटी 84 लाखांच्या मालमतांचे नुकसान झाले होते. मात्र, यामध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांचे कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Marathi news National Rs126 crore This is what Haryana lost in dera violence