न्या. लोया मृत्यूप्रकरणाची सुनावणी होणार सोमवारी

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

1 डिसेंबर 2014 रोजी न्या. लोया यांचे निधन झाले होते. मात्र, त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. न्या. लोया यांचा मृत्यू आणि त्यांच्याकडील सोहराबुद्दीन शेख चकमक खटला यांचा काहीतरी संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्या. लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र आणि नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली.

नवी दिल्ली : विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुनावणी सोमवारी (ता.22) केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी  होणार आहे.   

1 डिसेंबर 2014 रोजी न्या. लोया यांचे निधन झाले होते. मात्र, त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. न्या. लोया यांचा मृत्यू आणि त्यांच्याकडील सोहराबुद्दीन शेख चकमक खटला यांचा काहीतरी संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्या. लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र आणि नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने सुनावणी करण्याची तयारी दर्शवली. त्यावर आता सोमवारी सुनावणी केली जाणार आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी केली जावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. 

Web Title: Marathi news National SC bench headed by CJI Dipak Misra to hear Judge Loya case on Monday