आसाम राज्य रायफल्स जवानाच्या गोळीबारात पत्रकाराचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2017

"आरोपी जवान रियांग याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल'' 

                               (पोलिस अधीक्षक अभिजीत सप्तदर्शी )

                                          

आगरतळा : ज्येष्ठ पत्रकार सुदीप दत्त भौमिक यांचा त्रिपुरा राज्य रायफलच्या जवानाने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ही घटना आगरतळ्यापासून 20 किलोमीटरवर असलेल्या आर के नगर येथे घडली. भौमिक हे वृत्तांकनासाठी गेले असता ही घटना घडली.

भौमिक हे त्रिपुरा राज्य रायफल्सच्या दुसऱ्या तुकडीतील पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील कमांडंट यांना भेटण्यास गेले होते. त्यांच्याशी भेट घेऊन ते विशेष बातमी करणार होते. यादरम्यान टीएसआरचे जवान नंदगोपाळ रियांग आणि भौमिक यांच्यात भांडण झाले. त्यानंतर रियांग यांनी त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून भौमिक यांच्यावर गोळीबार केला. भौमिक यांच्या पोटाला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी नजीकच्या गोविंद बल्लभ पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारांपूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, आरोपी जवान रियांग याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम त्रिपुराचे पोलिस अधीक्षक अभिजीत सप्तदर्शी यांनी दिली.  

50 वर्षीय भौमिक हे स्थानिक बंगाली दैनिक सियांदन पत्रिकेत शोध पत्रकार होते. त्रिपुराचे दैनिक संबदचे संपादक प्रदीप दत्त भौमिक यांचे ते बंधू होते.

Web Title: marathi news national Senior Tripura journalist shot dead in altercation with State Rifles jawan