'यूपी'नंतर इतरही राज्यात ध्वनीक्षेपकांवर बंदी आणावी : सोनू निगम

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

मागील महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरत मशिदी, मंदिरे, चर्च आणि गुरुद्वारा येथे ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती की नाही, याची पडताळणी करण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशांचा विचार करूनच आम्ही ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करण्याचे ठरविले असल्याचे उत्तरप्रदेश गृह विभागाचे मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी सांगितले.

नवी दिल्ली : बॉलीवूड गायक सोनू निगम यांनी मागील वर्षी ध्वनीक्षेपकांच्या वापराला विरोध केल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. त्यानंतर आता उत्तरप्रदेश सरकारकडून सार्वजनिक ठिकाणांवर ध्वनीक्षेपकांवर बंदी आणण्यात आली आहे. या बंदीनंतर सोनू निगम हे आनंदित झाले असून, उत्तर प्रदेश सरकारने चांगली सुरवात केली आहे. त्यामुळे आता इतर राज्यांतही बंदी आणायला हवी, असे ते म्हणाले.

मागील महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरत मशिदी, मंदिरे, चर्च आणि गुरुद्वारा येथे ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती की नाही, याची पडताळणी करण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशांचा विचार करूनच आम्ही ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन करण्याचे ठरविले असल्याचे उत्तरप्रदेश गृह विभागाचे मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी सांगितले. त्यानुसार उत्तरप्रदेशमध्ये ध्वनीक्षेपकांना बंदी आणण्यात आली.

याबाबत सोनू निगम म्हणाले, मी जेव्हा याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा मला कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिंबा दिला नाही. पण मी माझ्या विचारांवर कायम होतो. हा मुद्दा काही लोकांनी विचित्ररितीने मांडला. काही लोकांनी तर सोनू विरूद्ध इस्लाम असे चित्र रंगवले होते. मी कोणत्याही पक्षाचा नाही. मी स्वत:ला धार्मिक मानत नाही.

Web Title: marathi news national Sonu Nigam Reaction On Loudspeaker ban in UP