कुस्तीपटू सुशीलकुमारविरोधात गुन्हा दाखल 

sushil
sushil

नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक विजेता आणि माजी विश्व विजेता सुशीलकुमार यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आज (शनिवार) गुन्हा दाखल केला. सुशीलकुमार समर्थकांनी प्रवीण राणा यांचे बंधू नवीन राणा यांना के. डी. जाधव स्टेडियमवर मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी सुशीलकुमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत प्रवीण राणा यांचे बंधू नवीन राणा यांनी याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सुशीलकुमार यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलम 323 आणि कलम 341 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीजिंग येथे एप्रिल 2018 मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी सराव सुरु असून, सरावादरम्यान ही घटना घडली. 

सुशील कुमार यांच्या 35-40 समर्थकांनी सराव कक्षात प्रवेश करून राणा समर्थकांना मारहाण केली. यामध्ये नवीन राणा यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे ते काही काळ अस्वस्थ होते. मारहाणीनंतर त्याच्या समर्थकांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर नवीन राणा यांनी सुशीलकुमार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी सुशीलकुमारवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याप्रकरणाची माहिती मिळाली असून, अद्याप माझ्याकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, असे भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रीज भूषण सिंग शरण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com