दहशतवादी आपले बंधू ; आमदार मीर यांचे वादग्रस्त वक्तव्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

''दहशतवादी हे जम्मू काश्मीरमधील असल्याने ते आमची मुले आहेत. जेव्हा त्यांना मारले जाते, तेव्हा सगळीकडे आनंद व्यक्त केला जातो. मात्र, त्यांच्या हत्येनंतर कोणत्याही प्रकारचा आनंद साजरा करायला नको. ते आपले बंधू आहेत''

जम्मू : ''दहशतवादी हे जम्मू काश्मीरमधील असल्याने ते आमची मुले आहेत. जेव्हा त्यांना मारले जाते, तेव्हा सगळीकडे आनंद व्यक्त केला जातो. मात्र, त्यांच्या हत्येनंतर कोणत्याही प्रकारचा आनंद साजरा करायला नको. ते आपले बंधू आहेत'', असे वादग्रस्त विधान वाची विधानसभा मतदार संघाचे आमदार ऐजास अहमद मीर यांनी केले.

दहशतवादी तुमचे बंधू आहेत, का असा प्रश्न विचारला असता त्यांनी होकार दर्शवला. तसेच दहशतवाद्यांच्या हत्येनंतर सुरक्षा दल आणि जवानांच्या माता-पितांची सहानुभूतीही असणार आहे. याबाबत काल (बुधवार) विधानसभेत मीर यांनी सरकारने संबंधित सर्व पक्षांची बातचीत करणे गरजेचे आहे. तसेच काश्मीर मुद्यावरही तोडगा काढण्यासाठी सांगितले. मीर हे यापूर्वीही तीन महिन्यांपूर्वी वादात अडकले होते. जेव्हा दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला तेव्हा कोणीही जखमी झाला नाही. हा हल्ला फक्त विचारसरणीच्या वादातून झाला आहे. 

दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी पीडीपी सरकारकडून निंदा केली जात आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Web Title: marathi news national Terrorists Our Brothers Martyrs says PDP MLA Aijaz Ahmad Mir