अलीगडमध्ये धुक्यामुळे दोन पोलिसांसह 7 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 28 जानेवारी 2018

सर्वजण छापेमारीची कारवाई करून परतत होते. या रस्त्यावर दाट धुके होते. मात्र, जीपच्या चालकाला रस्त्यांवर असलेले दाट धुके दिसले नाही. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी थेट तलावातील खोल पाण्यात पडली.

अलीगड : उत्तर प्रदेशात पोलिसांची जीप रस्त्यावरून जात असताना पलटल्याने तलावात पडून भीषण अपघात घडला. या अपघातात दोन पोलिसांसह 7 जणांचा मृत्यू झाला. ही घडना उत्तर प्रदेशातील अलीगड येथे घडली.

याबाबत वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेश पांडे यांनी सांगितले, की पोलिस उपनिरीक्षक प्रदिप शर्मा आणि पोलिस कॉन्स्टेबल देवेंद्र यादव हे सर्व एका जीपमधून येत असताना हा अपघात झाला. हे सर्वजण छापेमारीची कारवाई करून परतत होते. या रस्त्यावर दाट धुके होते. मात्र, जीपच्या चालकाला रस्त्यांवर असलेले दाट धुके दिसले नाही. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी थेट तलावातील खोल पाण्यात पडली. यामध्ये यातील सातही जणांना जलसमाधी मिळाली. मृतांमध्ये सर्वजण मध्यमवयीन असून, यामध्ये महिला आणि त्यांच्या मुलांचा समावेश आहे

Web Title: Marathi News National Two cops among 7 killed in accident due to fog in Aligarh