पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन ; दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

''पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा पावणेसातच्या सुमारास गोळीबार सुरु करण्यात आला''.  

जम्मू : पाकिस्तानकडून आज सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे जखमी झाले आहेत. पाकिस्तानी रेंजर्सने आरएसपुरा, अर्निया आणि रामगढ सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला.

पाकिस्तानी रेंजर्सनी दुसऱ्या दिवशी भारतीय चौक्यांना लक्ष्य करत गोळीबार केल्याचे उघडकीस आले आहे. या हल्ल्यात दोन जण ठार झाले आणि तीन जण जखमी झाले. मात्र, रात्रीच्या शांततेनंतर पुन्हा गोळीबार सुरू झाला. याबाबत सूत्रांनी सांगितले, की पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात बचनो देवी (रा. साई खुर्द), सुनील कुमार ऊर्फ जॉनी (रा. आरएसपुरा) सेक्टरमधील रहिवाशांचा मृत्यू झाला. तसेच यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. यातील तिघांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

''पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा पावणेसातच्या सुमारास गोळीबार सुरु करण्यात आला''.  

पाकिस्तानी रेंजर्सने बीएसएफच्या सुमारे 60 चौक्यांना लक्ष्य केले होते. मात्र, पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पाक रेंजर्सने उखळी तोफांचा मारा केला. या रेंजर्सनी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांवर गोळीबार केला. 

दरम्यान, पाकिस्तनाकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर गावांमधील शाळांना सुट्टी देण्यात आली असून, येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

Web Title: Marathi News National Two killed three injured in ceasefire violation by Pakistan along international border