ज्येष्ठांना विमा हफ्याची मर्यादा वाढवली

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज 2018-19 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्येष्ठांना 80डी आयकर कायद्यांतर्गत हफ्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा हफ्ता 30 हजार होता. आतामध्ये बदल करून 50 हजार करण्यात आला आहे. तसेच याचा फायदा आरोग्य विम्यासाठी होणार आहे. सध्या वृद्धांच्या आरोग्य विमाचा हफ्ता 25 हजार किंवा 30 हजार रुपये प्रतिवर्षासाठी करण्यात आला आहे. मात्र, आरोग्य विम्याचा हा हफ्ता वयोमानानुसार केला जाणार आहे.  

तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कलम 194ए अंतर्गत कोणतीही कपात करण्याची गरज नाही. कलम 80डी अंतर्गत आरोग्य विम्याचा हफ्ता वैद्यकीय खर्च 30 हजारांपासून 50 हजारांवर गेला आहे. 

Web Title: Marathi News National Union Budget Arun Jaitley for Senior Citizen