चक्क उपराष्ट्रपतींची चप्पल चोरीला !

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

भाजप खासदार पी. सी. मोहन यांच्या घरी नाश्ता करण्यासाठी नायडू गेले होते. मोहन यांच्या घरी जाण्यापूर्वी नायडूंनी त्यांची चप्पल मोहन यांच्या घराबाहेरच काढून ठेवली होती. मोहन यांची भेट घेऊन त्यांच्या घरातून नाश्ता करून बाहेर पडल्यानंतर नायडूंना त्यांची चप्पल दिसली नाही.

बेंगळूरू : चप्पल चोरीला जाणे ही तशी विशेष बाब नाही. आत्तापर्यंत अनेकांच्या चप्पला चोरीला गेल्या असतीलच. याचा अनुभव बहुतांश लोकांना असेल. मात्र, जेव्हा खुद्द देशाच्या उपराष्ट्रपतींची चप्पल चोरीला जाते तेव्हा... होय देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची चप्पल चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे.

भाजप खासदार पी. सी. मोहन यांच्या घरी नाश्ता करण्यासाठी नायडू गेले होते. मोहन यांच्या घरी जाण्यापूर्वी नायडूंनी त्यांची चप्पल मोहन यांच्या घराबाहेरच काढून ठेवली होती. मोहन यांची भेट घेऊन त्यांच्या घरातून नाश्ता करून बाहेर पडल्यानंतर नायडूंना त्यांची चप्पल दिसली नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी हरवलेली चप्पल खूप शोधली. मात्र, ती चप्पल मिळालीच नाही. अखेर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नायडूंसाठी नवी चप्पल आणली. 

दरम्यान, चक्क उपराष्ट्रपतींची चप्पल कोणी लांबवली असावी, याचा तपास लागू शकला नाही. मात्र, या घटनेनंतर कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. 
 

Web Title: Marathi News National vice president of india venkaiah naidu gets thwarted