शहीदांच्या कुटुंबीयांसाठी करावे तेवढे कमी : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जानेवारी 2018

''देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी जेवढे करावे तेवढे कमी आहे. आपण शहीदांच्या कुटुंबीयांना जो आर्थिक निधी देतो याचा विषय नाही. व्यक्तीचे आयुष्य कोणत्याही रुपयांतून त्याची किंमत तोलता येऊ शकत नाही. तुम्ही सर्व माझ्या वक्तव्याशी सहमत असाल''.

राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली : ''देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी जेवढे करावे तेवढे कमी आहे. आपण शहीदांच्या कुटुंबीयांना जो आर्थिक निधी देतो याचा विषय नाही. व्यक्तीचे आयुष्य कोणत्याही रुपयांतून त्याची किंमत तोलता येऊ शकत नाही. तुम्ही सर्व माझ्या वक्तव्याशी सहमत असाल'', असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. 

'भारत के वीर' या सीएपीएफच्या शहीदांवरील कादंबरी मालिकेच्या प्रकाशनादरम्यान ते बोलत होते. देशाचे रक्षण करण्यासाठी जवान प्राणांची आहुती देत आहेत. राजनाथसिंह म्हणाले, ''देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी करावे तेवढे कमी आहे. व्यक्तीचे आयुष्य कोणत्याही रूपयांतून किमतीतून तोलता येऊ शकत नाही. तसेच शहीदांच्या कुटुंबीयांसाठी जो आर्थिक निधी दिला जात आहे. त्या निधीबाबत कोणताही विषय नाही, माझ्या या वक्तव्याशी तुम्ही सर्व सहमत असाल", असेही राजनाथसिंह म्हणाले. 

Web Title: Marathi news National Whatever we do for family of martyrs it will always be less says union home minister rajnath singh