तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत रखडले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 'तिहेरी तलाकविरोधी विधेयक' संसदेत मांडले जाईल, असे सत्ताधारी भाजपकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आणि त्यानंतर ते मंजूरही करण्यात आले.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाला लोकसभेत मान्यता देण्यात आली. मात्र, आज संसदेचे हिवाळी अधिवेशन संपत आहे. मात्र, कोणत्याही निर्णयाविना हे विधेयक रखडले आहे.  

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 'तिहेरी तलाकविरोधी विधेयक' संसदेत मांडले जाईल, असे सत्ताधारी भाजपकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आणि त्यानंतर ते मंजूरही करण्यात आले. या विधेयकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी राज्यसभेत पाठवण्यात आले. मात्र, या विधेयकात काही बदल करण्याच्या सुचना काँग्रेसने केल्या होत्या. तरीदेखील सत्ताधारी भाजपकडून या विधेयकात कोणताही बदल न करता तसेच ठेवले गेले. त्यामुळे यावर कोणतीही चर्चा न होता हे विधेयक अडकले. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, अद्यापही या विधेयकावर राज्यसभेत मंजूरी देण्यात आली नाही. 

दरम्यान, केंद्रीय न्यायमंत्री रविशंकर प्रसाद आणि संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोएल यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांची भेट घेऊन तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे सांगितले होते.

Web Title: marathi news national Winter Session ends no headway on Triple Talaq Bill