आठ महिन्यांची मुलगी सोसतेय बलात्काराची यातना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नवी दिल्ली - दिल्लीत बलात्काराच्या घटना रोजच्या झाल्या आहेत. देशाच्या राजधानीतच इतका लाजीरवाणा प्रकार सतत घडत आहे आणि आपल्या देशातील सुव्यवस्था व मानसिकता बदलवण्यात आपण काहीच सुधारणा आणू शकलेलो नाही. नवी दिल्लीत आठ महिन्याच्या बालिकेवर तिच्याच चुलत भावाने बलात्कार केल्याची अमानविय घटना घडली आहे. बालिकेच्या कुटूंबियांचा नातेवाईक असलेला 28 वर्षीय तरुणाने मद्याच्या नशेत हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.  

बालिकेचे आई-वडील कामानिमित्त बाहेर जातात. त्यामुळे दोघे रोज बहिणीकडे या बाळाला ठेऊन बाहेर पडतात. रविवार असल्यामुळे त्या बहिणीचा 28 वर्षीय मुलगाही घरीच होता. दारुच्या नशेत या नराधमाने बालिकेवर बलात्कार केला. बालिकेचे आई-वडील कामावरुन परतले असता आईला तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसले. घाबरुन आईने सगळा प्रकार वडिलांना सांगितला. दोघांनी बाळाला घेऊन हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली. ज्यात या बाळावर बलात्कार झाल्याचे स्पष्टं झाले. बाळाची तब्येत गंभीर असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर बाळाला आयसीयु मध्ये हलविण्यात आले. आता बाळाची तब्येत ठिक असल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले आहे.     

संबंधित बातम्या - 

Web Title: marathi news new delhi rape eight months baby girl