मुझफ्फरनगरमध्ये अपघातात एक मृत्युमुखी, चार जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

जिल्ह्यात दोन विविध अपघातांच्या घटनांमध्ये एका कवंरियाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले, असे पोलिसांनी आज सांगितले. दिल्लीचा रहिवासी असलेला रणजित हा काल दिल्ली-हरियाना महामार्गावरील भेन्सी गावाजवळ गाडी चालवत असताना हा अपघात घडला.

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - जिल्ह्यात दोन विविध अपघातांच्या घटनांमध्ये एका कवंरियाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले, असे पोलिसांनी आज सांगितले. दिल्लीचा रहिवासी असलेला रणजित हा काल दिल्ली-हरियाना महामार्गावरील भेन्सी गावाजवळ गाडी चालवत असताना हा अपघात घडला.

कवंरियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगेचे पाणी घेऊन रणजित आणि त्याचे चार मित्र हरिद्वारहून परतत होते. अपघाताच्या दुसऱ्या घटनेत चार कावंरिया हे जखमी झाले आहेत. गाझीपूर गावाजवळ त्यांच्या दुचाकीची एका वाहनाला धडक झाल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींची ओळख पटली असून नितीन, सोनम, नेहा आणि सोनिया अशी त्यांची नावे आहेत.

Web Title: marathi news up news sakal news killed news