नीरव मोदी-चोक्‍सीला 'रेड कॉर्नर' नोटीस बजावा

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेच्या 12 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्या अटकेसाठी सक्त वसुली (ईडी) संचालनालयाने आपला मोर्चा आता इंटरपोलकडे वळवला असून, या दोघांना 'रेड कॉर्नर' नोटीस बजावावी, अशी विनंती केली आहे. 

सूत्रांनी सांगितले, की या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी विशेष न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. या दोघांना अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावावी; अशी विनंती 'सीबीआय'ने फ्रान्समधील इंटरपोलच्या मुख्यालयाला करावी. या दोघांना रेड कॉर्नर नोटीस बजावून अटक केल्यानंतर त्यांना कोठडी ठोठावल्यावर पुढील तपास व कारवाई करणे सोपे जाईल. 

मुंबईच्या विशेष न्यायालयाने 'ईडी'च्या विनंतीनुसार मोदी आणि चोक्‍सी यांना नुकतेच अजामीनपात्र वॉरंट बजावले असून, 'ईडी'ने त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्सही बजावले आहेत. 

Web Title: marathi news nirav modi CBI Punjab Natioanl Bank