PNB Scam : मेहूल चोक्‍सीच्या 1200 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त 

पीटीआय
गुरुवार, 1 मार्च 2018

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी व्यावसायिक मेहूल चोक्‍सीच्या 41 मालमत्तांवर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) टाच आणली आहे. चोक्‍सीच्या जप्त केलेल्या या 41 मालमत्तांची एकूण किंमत 1,200 कोटी रुपयांहून अधिक आहे. 

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि चोक्‍सी यांनी पंजाब नॅशनल बँकेची 12,000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात 'सीबीआय' आणि 'ईडी'ने कारवाई सुरू केली आहे. कारवाईच्या भीतीमुळे चोक्‍सी आणि मोदी दोघांनीही भारतातून पळ काढला आहे. अर्थात, 'आम्ही काहीही चुकीचे केले नाही' असा दावा दोघांनीही केला आहे. 

या प्रकरणी 'ईडी'ने आज केलेल्या कारवाईमध्ये चोक्‍सीचे मुंबईतील 15 फ्लॅट आणि 17 कार्यालये जप्त केली आहेत. याशिवाय, कोलकत्यामधील मॉल, अलिबागमधील चार एकरचे फार्म हाऊस आणि नाशिक, नागपूर, पनवेल, तमिळनाडूमधील विलुपुरम येथील एकूण 231 एकर जमिनीचा समावेश आहे. तसेच, हैदराबादमधील 170 एकर जमीनही जप्त करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत 500 कोटी रुपयांहून अधिक आहे. 

मुंबईतील चोस्कीचे बोरिवलीमधील चार फ्लॅट आणि सांताक्रुझमधील नऊ फ्लॅटवरही 'ईडी'ने कारवाई केली आहे. 

Web Title: marathi news nirav modi CBI Punjab Natioanl Bank Mehul Choksi