नीरव मोदी आणि त्याच्या भागीदाराचा पासपोर्ट रद्द 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेला व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा भागीदार मेहूल चोक्‍सी यांचे पासपोर्ट आज (शुक्रवार) परराष्ट्र मंत्रालयाने रद्द केले. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) परराष्ट्र मंत्रालयाला ही विनंती करण्यात आली होती. त्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने ही कारवाई केली. 

याशिवाय, 'तुमचे पासपोर्ट कायमचे रद्द का केले जाऊ नयेत' अशी नोटीसही परराष्ट्र मंत्रालयाने मोदी आणि चोक्‍सी यांना बजाविली आहे. यावर एका आठवड्यात त्यांनी उत्तर न दिल्यास दोघांच्याही पासपोर्टच्या वैधतेचे नूतनीकरण केले जाणार नाही. 'ईडी'नेही मोदी व चोक्‍सी यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. 

दरम्यान, नीरव मोदीशी संबंधित असलेल्या 50 हून अधिक कंपन्यांवर सीबीआय, ईडी आणि प्राप्तिकर खात्याचे अधिकारी कारवाई करणार आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली. नीरव मोदी आणि मेहूल चोक्‍सी यांच्या 36 कंपन्या 'गीतांजली जेम्स' या एका कंपनीच्या अखत्यारीत आहेत. या सर्व कंपन्यांपैकी जवळपास निम्म्या कंपन्या परदेशांत काम करत आहेत. 

'नीरव मोदी आणि त्याची पत्नी ऍमी मोदी यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांची यादी तयार होत असून त्यांच्यावर जप्तीची कारवाई होणार आहे' असेही अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

Web Title: marathi news nirav modi CBI Punjab Natioanl Bank Mehul Choksi