पाकिस्तानने मोदींना लावले 'हे' पण बिल

वृत्तसंस्था
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती वेळा एअर इंडियाऐवजी वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला आणि त्यावर किती खर्च झाला, हे जाणून घेण्यासाठी निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी आयटीआयमधून माहिती मागवली होती. त्यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत काही परदेश दौऱ्यांसाठी भारतीय वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला. एअरक्राफ्टच्या वापरावर भारत सरकारने आतापर्यंत एकूण 2 कोटींचा खर्च केला आहे. यात 2.86 लाख रुपयांचे बिल पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती वेळा एअर इंडियाऐवजी वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला आणि त्यावर किती खर्च झाला, हे जाणून घेण्यासाठी निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी आयटीआयमधून माहिती मागवली होती. त्यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत काही परदेश दौऱ्यांसाठी भारतीय वायूदलाच्या एअरक्राफ्टचा वापर केला. एअरक्राफ्टच्या वापरावर भारत सरकारने आतापर्यंत एकूण 2 कोटींचा खर्च केला आहे. यात 2.86 लाख रुपयांचे बिल पाकिस्तानचे असल्याचे समोर आले आहे. मोदींच्या परदेशी दौऱ्यांच्या दरम्यान ज्या वेळी पंतप्रधानांचे एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या आकाशातून गेले, त्या वेळेचे नेव्हिगेशन चार्जेस पाकिस्तानने आकारले असून, हे नेव्हिगेशन चार्जेस 2.86 लाख रुपये एवढे आहेत. 

बात्रांना मिळालेल्या माहितीनुसार, जून 2016 पर्यंतची माहिती त्यांना देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी एकूण 11 परदेश दौरे आयएएफच्या एअरक्राफ्टने केले. यामध्ये नेपाळ, भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, कतार, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, रशिया, इराण, फिजी आणि सिंगापूर या परदेश दौऱ्यांचा समावेश आहे.

पाकिस्तानने कोणत्या दौऱ्याचे बिल लावले?
 - 2015 मध्ये रशिया आणि अफगाणिस्तानच्या दौऱ्याहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळासाठी पाकिस्तानात उतरले होते. त्यावेळच्या त्यांच्या भेटीसाठी 1.49 लाख रुपयांचा नेव्हिगेशन चार्ज लावण्यात आला आहे. 
- मार्च 2016 मधील इराण दौऱ्यासाठी 77 हजार 215 नेव्हिगेशन चार्ज लावण्यात आला आहे.
- कतार दौऱ्यासाठी 59 हजार 215 रुपयांचा नेव्हिगेशन चार्ज लावण्यात आला.
 

Web Title: marathi news pakistan narendra modi navigation-charges