पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सध्या ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे दिल्लीत होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांच्या निधनावर भाजपसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली : पालघरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार चिंतामण वनगा यांचे आज (मंगळवार) सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. 

खासदार चिंतामण वनगा हे 63 वर्षांचे होते. दिल्लीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात जात असताना त्यांची प्राणज्योत मालविली. चिंतामण वनगा हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते तीन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार राहिले होते. चिंतामण वनगा हे स्वतः एक वकील तसेच खासदार असूनही पालघरमधील जनतेला शेतात नांगरणी करताना दिसत असे. 

सध्या ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे दिल्लीत होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांच्या निधनावर भाजपसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
शुभमान गिलने मोडले अनेक विक्रम; वडीलांकडून कौतुक
भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; अंतिम फेरीत प्रवेश
धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली: शिवसेना​
ध्येय, कष्ट, जिद्दीच्या ओंजळीत 'पद्म'वृष्टी​
ध्येयपूर्तीसाठी स्मार्ट वर्क...!​
सरकारी अनास्थेमुळे मातेवर आत्महत्या करण्याची वेळ​
महात्मा गांधींना हवं होतं अहिंसक विज्ञान​
स्मरण एका इतिहासाचे​
झीनत अमान यांची बिझनेसमनविरोधात विनयभंगाची तक्रार

Web Title: Marathi news Palghar BJP MP Chintaman Vanga passes away