पेस्ट्री सोबत 'पाय डे'चे गुगल डूडल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

GOOGLE च्या दुसऱ्या G साठी 'पाय' चिन्हाचा वापर केला गेला आहे. हे डूडल अवॉर्ड विनिंग पेस्ट्री शेफ यांनी बनविले आहे. 

नवी दिल्ली - आज 14 मार्च 'पाय डे' (π) म्हणून साजरा केला जातो. या निमित्त गुगलने डूडलद्वारे या दिवसाचे महत्त्व व्यक्त केले आहे. 'पाय' महत्त्वाच्या गणितीय निर्धारकांपैकी एक भौतिक निर्धारक आहे. जगभरातील गणित तज्ञ दर वर्षी हा दिवस सजरा करतात. 1706 मध्ये सर्वप्रथम 'पाय'चा वापर विलियम जोंस यांनी केला. 1737 मध्ये स्विस गणित तज्ञ लियोगार्ड यूलर यांनी त्यांच्या एका प्रयोगासाठी 'पाय'चा वापर केला तेव्हापासून 'पाय'ची विशेष ओळख निर्माण झाली. 

1988 मध्ये सर्वप्रथम विज्ञान तज्ञ लैरी शॉ यांनी 'पाय डे' (π) साजरा केला. गुगलने डूडलमध्ये पेस्ट्री, बटर, सफरचंद आणि संत्र्याची सालटं यांनी उपयोग केला आहे. GOOGLE च्या दुसऱ्या G साठी 'पाय' चिन्हाचा वापर केला गेला आहे. हे डूडल अवॉर्ड विनिंग पेस्ट्री शेफ यांनी बनविले आहे. 

आजची 14-03-18 ही तारीख आपण अशी लिहीत असलो तरी अमेरिकेत ती 03-14-18  अशी लिहीतात. या तारखेतले पहिले तीन आकडे 'पाय'च्या 3.14 या पहिल्या तीन आकड्यांशी जुळतात. त्यामुळे हा दिवस 'पाय डे' म्हणून साजरा केला जातो. 

Web Title: marathi news pi day mathematics google doodle