भाजपला प्रश्न करताना राहुल गांधींचे गणित चूकले 

Marathi news Rahul Gandhi gets wrong in question to BJP
Marathi news Rahul Gandhi gets wrong in question to BJP

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काँग्रेसचे संभाव्य  अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून 'भाजपला प्रत्येक दिवशी एक प्रश्न' अशी मोहीम चालवली आहे.

आज याच प्रश्नांच्या फळीतील सातवा प्रश्न विचारताना मात्र राहुल यांनी एक चूक केली आहे. प्रश्नाबरोबर मांडलेल्या महागाई बाबतच्या तक्त्यात चूकीचे आकडे देत त्यांनी हा सातवा प्रश्न ट्विट केला. येणारी गुजरात निवडणूक विचारात घेऊन 2014 व 2017 या दरम्यान वाढलेली महागाई दर्शविणारी आकडेवारी या तक्त्यात मांडली होती. गॅस सिलेंडर, डाळ, टमाटर, कांदे, दूध आणि डिझेलच्या दरात कितीने वाढ झाली हे सांगणारे आकडे मात्र चूकले होते.

सरकार फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे का? असा प्रश्न या ट्विटमधून राहुल गांधींनी मोदी यांना विचारला आहे. चूक लक्षात येताच राहुल यांनी ते चूकीचे ट्विट काढून टाकले व लगेच योग्य आकड्यांसह तसेच ट्विट पुन्हा केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com