राहुल गांधींचे सामान्यांसाठी खुले सत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - काँग्रेसची पडती बाजू सांभाळत राहुल गांधी यांनी डिसेंबर 2017 मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. गेल्या 3 महिन्यात काँग्रेसच्या कामकाजात बदल आणण्याचे प्रयत्न राहुल गांधींनी केले आहेत. असाच एक प्रयत्न म्हणजे राहुल गांधी हे आज सकाळी काँग्रेसच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात उपस्थित आहेत. आजपासून प्रत्येक आठवड्यात राहुल गांधी हे पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांच्याशी संवाद साधणार आहेत.

काँग्रेसचे वरिष्ठ नेता यांनी काल सांगितल्याप्रमाणे, 24 अकबर रोड येथे असलेले काँग्रेसचे मुख्यालयात आठवड्यातील एक दिवस तासभर सामान्यांशी चर्चा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. ओपन हाऊस सत्रात पक्षाने ठरवून दिलेल्या 30 लोकांना या एक तासात भेटता येईल. तसेच दोन आठवड्यातून एकदा गांधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटतील.    

Web Title: marathi news rahul gandhi open house session congress