राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

नवी दिल्ली : विरोधकांना दिलासा देणाऱ्या उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने एकजुटीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. तिसऱ्या आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येण्याआधी त्यांना काँग्रेससोबत आणण्यासाठी राहुल गांधींनी औपचारिक संवाद आरंभल्याचे समजते.

याअंतर्गत आज राहुल यांनी वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली, तर 28 मार्चला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनाही ते भेटणार असल्याचे कळते. 

सोनिया गांधींनी काल (ता. 13) मेजवानीच्या निमित्ताने भाजपविरोधातील समविचारी पक्षांशी अनौपचारिक बोलणी केली होती. यात संसद अधिवेशन आणि सरकारचा कारभार यावर आडवळणाने चर्चा झाली; परंतु 2019 च्या "लोकसभा निवडणुकीसाठी एकजुटीची गरज' त्यामागे असल्याचे बोलले जाते.

आज खुद्द राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांशी संसदेत बोलताना, या एकजुटीसाठी सर्व नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले, असे सूत्रांकडून समजते. काँग्रेसचे महाधिवेशन, तसेच संघटनात्मक कामकाज आटोपून अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरू करणार असल्याचेही राहुल यांनी या वेळी सांगितल्याचे कळते.

सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधींनी सविस्तर चर्चा केली.

Web Title: marathi news Rahul Gandhi Sharad Pawar