काँग्रेस लोकशाहीविरोधी; भाजपची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 मार्च 2018

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सोनिया व राहुल गांधी यांचा लोकशाहीवर विश्‍वासच नाही; सततच्या पराभवातून हताश होऊन काँग्रेस संसद ठप्प पाडत आहे, असा हल्ला भाजपने चढविला. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी आज पक्षाच्या संसदीय बैठकीत बोलताना संसदेतील गोंधळाला प्रामुख्याने काँग्रेस पक्षच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काँग्रेसच्या लोकशाहीविरोधी वर्तनाचा संदेश देशभरात नेण्याची सूचना सत्तारूढ खासदारांना करण्यात आली. 

आजच्या बैठकीत मोदी यांचे "लर्निंग वॉरिअर्स' हे पुस्तक भाजप खासदारांना वाटण्यात आले. वाराणसीला जायचे असल्याने आज मोदींचे भाषण होऊ शकले नाही.

अनंतकुमार, विजय गोयल व अर्जुन राम मेघवाळ यांनी संसद ठप्प पडण्याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. अनंतकुमार म्हणाले, की ""बॅंकिंग गैरव्यवहार मुळात काँग्रेसच्याच काळातील आहे. त्यामुळे यावर संसदेत किंवा बाहेर कोठेही या पक्षास चर्चाच नको आहे. काँग्रेसला हा गैरव्यवहार लपवायचा आहे. संसदेत गोंधळ घालणारे तेलुगू देसम, अण्णाद्रमुक यांचेही काही मुद्दे जरूर आहेत; पण विशेषतः राज्यसभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने चर्चेची तयारी दाखवली तर इतर पक्षही चर्चेत सहभागी होतील व गोंधळ थांबेल.'' 

कर्नाटकमध्ये विजयी होऊ 
दोन्ही सभागृहांत या गैरव्यवहारावर चर्चेची काँग्रेसची मागणी त्यांना हव्या त्या नियमांतर्गत मान्य करण्यात आली तरी हा पक्ष संसद ठप्प करत आहे. 

राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविताना अनंतकुमार यांनी सांगितले, की अलीकडे ईशान्येतील तिन्ही राज्यांत काँग्रेस पराभूत झाला. कर्नाटकही त्याला अपवाद नसेल व भाजप किमान दीडशे जागा मिळवून तेथे सत्तेत येणार हे निश्‍चित आहे. राहुल हे या पक्षाचे गैरहजर अध्यक्ष बनले आहेत. जेव्हा पक्ष हरतो त्या पराभवाच्या क्षणी राहुल हे इटलीत किंवा सिंगापूरमध्ये असतात. काँग्रेसची दुर्दशा सोडून इतर विषयांवर ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न ते करतात.

Web Title: marathi news Rahul Gandhi Sonia Gandhi Parliament Session BJP