'यूपी'मध्ये शक्तीकुंज एक्सप्रेसचे 7 डबे घसरले, जीवितहानी नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

सर्व प्रवाशांना उर्वरित डब्यांमध्ये बसविण्यात आले, आणि सकाळी साडेसात वाजेपर्यंत ते सर्वजण घटनास्थळावरून पुढे गेले.

नवी दिल्ली : जबलपूरकडे जाणारी शक्तीकुंज एक्सप्रेस उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात रुळावरून घसरली. या रेल्वेचे एकूण सात डबे घसरले. 

सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी हा अपघात झाला. घटनास्थळी आम्ही सर्व व्यवस्था केली आहे, असे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले. सर्व प्रवाशांना उर्वरित डब्यांमध्ये बसविण्यात आले, आणि सकाळी साडेसात वाजेपर्यंत ते सर्वजण घटनास्थळावरून पुढे गेले. सर्व प्रवासी सुरक्षित असून अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. 

अपघात झाला तेव्हा ही रेल्वे गाडी जास्त वेगात नव्हती. ताशी 40 किमी एवढ्या वेगाने ती जात होती, त्यामुळे दुखापती झाल्या नाहीत. एका महिन्याच्या आतच उत्तर प्रदेशात तीनवेळा रुळावरून रेल्वे घसरून अपघात घडले आहेत. यापूर्वी 19 ऑगस्ट रोजी मुझफ्फरनगरमध्ये उत्कल एक्सप्रेस घसरून 22 लोक मृत्युमुखी, तर 156 जखमी झाले होते. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)

Web Title: marathi news rail accident shaktikunj express derailed