अंधश्रद्धाळू डॉक्‍टरने 'भूता'वरील उपचारासाठी मारली रुग्णाच्या कानाखाली

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

एका अंधश्रद्धाळू डॉक्‍टरने उपचार सुरू असलेल्या रुग्णामध्ये शिरलेल्या भूतावर उपचार करण्यासाठी महिला रुग्णाच्या कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बारमेर (राजस्थान) - एका अंधश्रद्धाळू डॉक्‍टरने उपचार सुरू असलेल्या रुग्णामध्ये शिरलेल्या भूतावर उपचार करण्यासाठी महिला रुग्णाच्या कानाखाली मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भूताने आपली वेणी कापून टाकल्याची तक्रार करत एक महिला रुग्ण रुग्णालयात दाखल झाली. तेथील डॉक्‍टर सुरेंद्र बहारी यांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी उदबत्तीचा वापर केला आणि तिच्यावर "भूता'वर उपचार करण्यासाठी तिच्या कानाखाली मारल्या. "ज्यावेळी ती महिला रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी तिचे डोके खूप जड होते. तिच्यावरील उपचाराचा एक भाग म्हणून तिला कानाखाली मारले', अशा प्रतिक्रिया बहारी यांनी व्यक्त केली. प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. "एका डॉक्‍टरला अशा प्रकारचे वागणे शोभत नाही. जर तो दोषी आढळला तर त्याला शिक्षा करण्यात येईल', अशा प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्याने व्यक्त केल्या आहेत.

बारमेरशिवाय राजस्थानमधील नागोर, जैसलमेर आणि जोधपूरसह अन्य काही जिल्ह्यात भूते महिलांची वेणी कापत असल्याची अंधश्रद्धा वेगाने पसरत आहे. यासंदर्भात अनेक महिलांनी तक्रार केली आहे. या संदर्भातील अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्ह्यातील पोलिस अधिकारी करत आहेत.
 

■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​
राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

Web Title: marathi news rajasthan news Superstitious doctor maharashtra news