भारताच्या भात्यात आज दाखल होणाऱ्या राफेलची वैशिठ्ये..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

विजयादशमीच्या मुहूर्तावर भारताला पाहिलं राफेल विमान मिळणार आहे. फ्रान्सकडून पाहिलं राफेल फायटर जेट भारताला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्समध्ये दाखल झालेत. पॅरिसमध्ये हा हस्तांतरणाचा सोहळा पार पडणारे. राजनाथ सिंह राफेल फायटर जेटचं शस्त्रपूजन देखील करणार आहेत. 36 राफेलपैकी पहिलं राफेल फायटर जेट आज भारताकडे सुपूर्द करण्यात येणारे.

राफेलची काही ठळक वैशिष्ठ्य : 

  • राफेल विमानाचा वेग प्रतितास 2,223 किलोमीटर आहे
  • राफेल विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं
  • राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं
  • राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे
  • राफेल विमानाला मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं
  • राफेलची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं
  • राफेल हे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे, त्याचसोबत राफेल विमान वेगवेगळ्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करू शकतं.

Image may contain: Rajnath Singh

Photo - फ्रान्समध्ये दाखल झालेले रक्षामंत्री राजनाथसिंह 

राफेल भारतात येत असल्याने सगळेच उत्साही असल्याचं मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलंय. राफेल हे अत्यंत अद्ययावत लढाऊ विमान असून हे विमान कोणत्याही मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

WebTitle : marathi news Rajnath Singh To Officially Receive First Rafale Fighter Jet Today

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Rajnath Singh To Officially Receive First Rafale Fighter Jet Today

टॅग्स
टॉपिकस