पूरग्रस्त नागरिकांना मोफत 'टॉकटाइम'

पीटीआय
शुक्रवार, 7 जुलै 2017

गुवाहाटी - ईशान्य भारतातील पूरस्थितीत नागरिकांना आपत्कालीनप्रसंगी संपर्क साधण्यासाठी व्होडाफोन कंपनीने 50 रुपयांचा मोफत टॉकटाइम दिला आहे.

गुवाहाटी - ईशान्य भारतातील पूरस्थितीत नागरिकांना आपत्कालीनप्रसंगी संपर्क साधण्यासाठी व्होडाफोन कंपनीने 50 रुपयांचा मोफत टॉकटाइम दिला आहे.

पावसामुळे ईशान्य भारताला अनेक भागात पूरसदृश स्थिती आहे. आसाममध्ये कामरूप, करीमगंज आणि बोंगाईगाव, मणिपूरमध्ये उखूर व विष्णूपूर आणि उत्तर त्रिपुरा यांना पुराचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये पुराचे पाणी घुसले असून, संपर्क यंत्रणेवर परिणाम झाला आहे. नागरिकांना आपत्कालीनप्रसंगी संपर्क साधता यावा, यासाठी व्होडाफोनने सर्व ग्राहकांना 50 रुपयांचा टॉकटाइम मोफत दिला आहे. हा टॉकटाइम फक्त स्थानिक कॉलसाठी असणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासोबत आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने ग्राहकांना पूरस्थितीची माहिती देणारे संदेश पाठविण्यात येत आहेत.

Web Title: marathi news sakal news talk time