मुझे लडकी मिल गयी - सलमान खान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

दबंग सलमान खानला अखेर मुलगी मिळाली. लवकरच सलमानच्या फॅन्सची प्रतिक्षा तो संपवणार असल्याची चिन्ह दिसत आहे.

मुंबई - दबंग सलमान खानला अखेर मुलगी मिळाली. लवकरच सलमानच्या फॅन्सची प्रतिक्षा तो संपवणार असल्याची चिन्ह दिसत आहे. हे चिन्ह सलमानने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिले आहे. 

'मुझे लडकी मिल गयी' अशा आशयाचे स्टेटस सलमान खान याने ट्विटरवर ठेवले आहे. सलमानचे फॅन्सच काय तर त्याच्या जवळचे आणि बॉलिबवूडमधील त्याचा मित्रपरीवारही त्याच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. एकावर एक हिट देणारा 52 वर्षीय सलमानने आता तरी आपला घर संसारचा विचार करावा, असे सल्ले त्याला अलेकांनी दिले. कधी हास्यविनोदात घेत तर कधी तिरकस उत्तर देत लग्नं विषयावर सलमानने टाळाटाळच केली. पण 'मुझे लडकी मिल गयी' या त्याच्या स्टेटस वरुन पुन्हा एकदा त्याच्या फॅन्सच्या आशा जाग्या झाल्या आहेत.

आता या ओळींचा अर्थ नक्की लग्नासाठी मुलगी मिळाली आहे, याबाबीशी जोडणे शक्य होणार नाही. कारण या ओळीशिवाय अजून काहीही खुलासा सलमान खानने केलेला नाही. 

सलमान सध्या रोमानियन मॉडेल लुलिया वंतुर हिला डेट करत आहे. लुलियाने काही दिवसांपुर्वी मनिष पॉल सोबत एका म्युझिक व्हिडिओत काम केले होते. 'मुझे लडकी मिल गयी' या स्टेटसद्वारे सलमानला नेमके काय म्हणायचे आहे, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. ज्यात प्रामुख्याने लग्नासाठी कुणी मुलगी मिळाली किंवा त्याच्या कोणत्या आगामी चित्रपटाशी संबंधित या ओळी असाव्यात किंवा लग्नं नाही तरी एखादी मुलगी दत्तक घेण्याचा तर विचार सलमान करत नाहीये ना!... असे विविध कयास पैकी बरोबर अंदाज लागेल कि भलतच काही विषय आहे, हे तर चुलबूल सलमानच सांगू शकेल.   

Web Title: marathi news salman khan new tweet on marriage