राममंदिराचा प्रश्न सुटला नाही तर भारताचा सिरीया होईल - श्रीश्री

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

'मुस्लिमांनी आयोध्येवरील आपला हक्क सोडला पाहिजे, आयोध्या हे मुस्लिमांसाठी श्रद्धेचे ठिकाण नाही. तसेच भगवान रामास आम्ही दुसऱ्या ठिकाणी हलवू शकत नाही.'

- श्री श्री रविशंकर

दिल्ली : राममंदिर वाद लवकर सोडवला नाही तर भारताची स्थिती लवकरच सिरीयासारखी होईल, असे रामजन्मभूमी व बाबरी मशिदीच्या वादात आणखी भर पडेल असे विधान आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. 

'मुस्लिमांनी आयोध्येवरील आपला हक्क सोडला पाहिजे, आयोध्या हे मुस्लिमांसाठी श्रद्धेचे ठिकाण नाही. तसेच भगवान रामास आम्ही दुसऱ्या ठिकाणी हलवू शकत नाही.' असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

सिरीयामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर-अल्-असाद यांचे सरकार असल्यापासून संघर्षाला व युद्धाला सुरवात झाली होती. हे युद्ध मागचे आठ वर्ष चालू आहे व अजूनही संपण्याच्या मार्गावर नाही. या संघर्षात 465,000 पेक्षा जास्त सिरीयन नागरिकांना जीव गमवावा लागला व त्याहून जास्त जखमी झाले. सिरीयातील 12 दशलक्षाहून अधिक नागरिकांना या काळात देश सोडून जावे लागले. सिरीयाच्या संघर्षाची चर्चा अजूनही जगभर होत आहे. 

रविशंकर यांनी गेल्या वर्षभरात आयोध्या, बंगळुर, लखनौ, दिल्ली, हैदराबाद व चेन्नई येथील पाचशेहून अधिक राजकीय नेत्यांशी हा वाद सोडवण्याच्या दिशेने चर्चा केली. पण काही लोकांना या वादावर पडदा टाकायची इच्छा नसून ते मला विरोध करतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.   

Web Title: Marathi news shri shri ravishankar statement ram temple babri masjid