श्रीदेवीच्या मृत्यूचे वृत्तवाहिनीकडून प्रात्यक्षिक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये पडून कसा झाला असेल याचे प्रात्यक्षिक स्वतः त्या वाहिनीच्या बातमीदाराने केले.

बॉलीवूडमधली 'चांदनी' निखळल्यानंतर तिच्या मृत्यूमुळे सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. दुबईमध्ये लग्नसमारंभासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असे सर्वप्रथम समोर आले. पण दुबईच्या नियमांप्रमाणे झालेल्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बाथटबमध्ये पडून झाल्याचे निष्पन्न झाले. 

अनेकांनी आपल्या स्टुडीओमध्ये बाथरूम व बाथटबचे व्हिज्युअल्स तयार करून त्या समोर बातम्या दिल्या. आपल्या कल्पनाशक्तीवर जोर देऊन वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे वार्तांकन केले. एका स्थानिक वृत्तवाहिनीने तर या सर्वाची परिसीमाच गाठली. श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये पडून कसा झाला असेल याचे प्रात्यक्षिक स्वतः त्या वाहिनीच्या बातमीदाराने केले. यामुळे श्रीदेवीचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अजूनच गोंधळ उडाला आहे.

Web Title: Marathi news sridevi news channel demonstration of death

टॅग्स