सुषमा स्वराज यांच्याकडून मीरा कुमार लक्ष्य

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारमधील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना लक्ष्य केले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात लोकसभेच्या अध्यक्ष असताना मीरा कुमार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून स्वराज यांनी केलेल्या भाषणात वारंवार अडथळे आणल्याचा व्हिडिओ जारी केला आहे.

यूपीच्या सत्ताकाळात भाजप हा पक्ष विरोधी बाकांवर बसत होता, तर मीरा कुमार लोकसभा अध्यक्ष होत्या. "मीरा कुमार या लोकसभा अध्यक्ष म्हणून, विरोधकांना कशी वागणूक देतात? हे बघा' असे सांगत सुषमा स्वराज यांनी 30 एप्रिल 2013 रोजीचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून भूमिका बजावत असलेल्या सुषमा स्वराज या कॉंग्रेसचे गैरव्यवहार कसे बाहेर येत आहेत, याचे वर्णन करत आहेत आणि लोकसभाध्यक्षांनी स्वराज यांना 6 मिनिटांच्या भाषणात 60वेळा अडवले, असे एक जुने वृत्त ट्विट करून म्हटले आहे.
एप्रिल 2013मध्ये यूपीएच्या सत्ताकाळात समोर आलेल्या गैरव्यवहारांवरून विरोधकांनी मनमोहनसिंग सरकारवर हल्लाबोल चढविला होता. स्वराज यांनी आपल्या भाषणात राष्ट्रकुल स्पर्धा, कोळसा खाण वाटप आणि टूजी गैरव्यवहाराचा उल्लेख केला आहे. सुरवातीची तीन मिनिटे सुषमा स्वराज यांच्या भाषणात कोणताही व्यत्यय येत नाही. मात्र त्यानंतर मीरा कुमार, "थॅंक यू', "ऑलराईट', "ओके', "आय हॅव टू प्रोसिड' असे उल्लेख अनेकदा करताना दिसत आहेत. तसेच स्वराज यांना त्यांचे म्हणणे मांडण्यापासून रोखत आहेत, असे दिसून येत आहे.

राष्ट्रपतिपदाची निवडणूक होऊ घातली आहे. अशात सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याशी लढत देणाऱ्या मीरा कुमार कशी गळचेपी करतात, याचे उदाहरण देण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा असला तरीही त्यावरून आता भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात पुन्हा जुंपण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Web Title: marathi news sushma swaraj meera kumar sakal news