ताजमहालच्या आधी तुमची डोकी साफ करा- ओवैसी

असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद : "ताजमहालमध्ये झाडू मारण्यापेक्षा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अगोदर त्यांच्या पक्षातील लोकांची डोकी साफ केली पाहिजेत," अशी टिपण्णी ऑल इंडिया मजलिस-ई-मुस्लिमीन (AMIM) पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. 

जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानली जाणारी वास्तू म्हणजे ताजमहालविषयी भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालात जाऊन झाडू मारत साफसफाई केली. योगी आज सकाळी आग्रा येथे पोचले आणि ताजमहालच्या पश्चिम दरवाजाच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता अभियानात भाग घेत तिथे झाडू मारला. 

मुख्यमंत्री योगी यांनी प्रथम नगला पैमामध्ये रबर चेक डॅमची पाहणी केली. नंतर त्यांनी हेलिकॉप्टरने ताजमहालाकडे रवाना झाले. त्यांच्या येथील झाडू मारण्यावरून ओवैसी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com