अनंतनाग हल्यातील तिसरा दहशतवादी तेलंगणाचा

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

हैदराबाद - अनंतनाग येथे 12 मार्च रोजी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दहशतवाद्यांपैकी इसा फजली श्रीनगर आणि सय्यद ओवेस कोकेरंग येथील होते. परंतु, तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली नव्हती. आता हा दहशतवादी तेलंगणाचा असल्याची माहिती समोर आली आहे. महंम्मद तौफिक (26) असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून महंम्मद दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला असवा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंम्मद 'अंसार गजवातुल हिंद' नामक दहशतवादी संघटनेशी संबंधीत होता. 

अनंतनाग येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Web Title: marathi news Telangana Man Identified As Third Terrorist Killed In Anantnag Encounter