वणव्यात अडकलेल्या गिर्यारोहकांपैकी 15 जणांची सूटका करण्यात यश

वृत्तसंस्था
सोमवार, 12 मार्च 2018

थेनी (तमिळनाडू) - कुरंगनी येथील जंगलात कोईमतूर आणि इरोडे येथून सुमारे 36 विद्यार्थी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. परंतु, तेथून परतत असताना जंगलात अचानक लागलेल्या आगीमुळे हे विद्यार्थी अडकून पडले होते. त्यातील 15 जणांची सूटका करण्यात यश आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अन्य विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. सीतारामन यांनी हवाई दलाच्या दक्षिण मुख्यालयाला मदतीसाठी सूचना दिल्या असून, हवाई दलाच्या सुलूर येथील तळावरून दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी ट्वीटद्वारे जाहीर केले. तसेच हवाई दलाच्या दक्षिण मुख्यालयाकडून थेनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news Theni forest fire Kurangani students