"निमलष्करी'च्या कर्मचाऱ्यांना टोलमाफी देण्यास नकार

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

नवी दिल्ली - निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर टोल सवलत देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेटाळला आहे.

नवी दिल्ली - निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर टोल सवलत देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने फेटाळला आहे.

निमलष्करी दलाच्या वर्दीतील अथवा वर्दीविना असलेल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सादर केल्यावर राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी देण्यात यावी, असा प्रस्ताव गृह मंत्रालयाने रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठविला होता. यावर उत्तर देताना रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे, की राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 नुसार सरकारी कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी आहे. हे वाहन सरकारी कामकाजासाठी वापरण्यात येत असल्याची आवश्‍यक कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. मात्र, सरकारी कामकाजासाठी वापर न होणाऱ्या खासगी वाहनांना टोलमाफी देण्याची कोणतीही तरतूद नाही.

गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आठ निमलष्करी दले येतात. या दलांमध्येसुमारे दहा लाख कर्मचारी आहेत. यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस, आसाम रायफल्स, राष्ट्रीय सुरक्षा दल, सशस्त्र सीमा दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांचा समावेश आहे.

Web Title: marathi news toll free national news