त्रिपुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा पाडला

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

त्रिपुरा - विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागातील पुतळा बुलडोझरने पाडला. त्यानंतर त्यांनी पुतळ्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले. या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यावेळी भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावली. मात्र, या विजयाला 48 तास उलटत नाही तोच भाजपाच्या कार्यकर्त्यांना केलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

2013मध्ये त्रिपुरात डाव्यांची सत्ता आल्यानंतर सरकारतर्फे बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागात लेनिनचा पुतळा उभारण्यात आला होता. काल दुपारी 3.30 भाजपाचे काही कार्यकर्ते याठिकाणी जमले आणि त्यांनी बुलडोझरच्या सहाय्याने हा पुतळा पाडला. यावेळी त्यांच्याकडून 'भारत माता की जय' अशा घोषणाही देण्यात आल्या. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुतळा खाली पाडल्यानंतर त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते लेनिनच्या शीराला बराचवेळ फुटबॉलसारखे लाथाडत होते. 

Web Title: marathi news tripura bjp lenin statue