'उबेर' चालकाची महिला प्रवाशास शिवीगाळ; अर्ध्या वाटेतच उतरविले! 

वृत्तसंस्था
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : 'उबेर'च्या चालकांविरुद्ध गैरवर्तणुकीच्या तक्रारींमध्ये वाढच होताना दिसत आहे. 'न्यूज-एक्‍स' या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला 'उबेर'च्या एका वाहनचालकाने रात्री अर्ध्या वाटेतच सोडून दिले आणि शिवीगाळ करत मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. 

जानकी दवे या महिला पत्रकाराने यासंदर्भात 'फेसबुक'वर घडलेली घटना मांडली आहे. दवे यांच्या फेसबुक पोस्टनुसार, गेल्या सोमवारी नोएडाहून दिल्ली विमानतळाकडे जाण्यासाठी त्यांनी 'उबेर'ची टॅक्‍सी बोलाविली होती. दवे यांची फ्लाईट रात्री 8.05 ची होती. पण शहरातील वाहतूक कोंडीमध्ये दोन तासांहून अधिक काळ अडकल्यामुळे त्यांना वेळेत विमानतळावर पोचणे शक्‍य नव्हते. त्यामुळे दवे यांनी 'उबेर' चालकाला पुन्हा नोएडाला सोडण्याची विनंती केली. यास त्या चालकाने नकार दिला. त्यामुळे आधी ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच विमानतळावर सोडण्यास दवे यांनी सांगितले. 

पण त्या चालकाने राव तुलाराम उड्डाणपुलाच्या खाली अंधाऱ्या जागी उतरविले. 'किमान प्रकाश असलेल्या जागी तरी सोडा' अशी विनंती दवे यांनी केली; मात्र त्या चालकाने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. दवे यांचे सामानही त्याने खाली फेकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना घडत असताना रस्त्यावरील एकानेही दवे यांना मदत केली नाही. 

'त्या चालकास निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे' अशी माहिती 'उबेर'तर्फे देण्यात आली.

Web Title: marathi news Uber driver abuses Woman passenger in Delhi