ईद साजरी करत नाही, हिंदू असल्याचा अभिमान - आदित्यनाथ

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

योगी आदित्यनाथ हे केवळ 'तथाकथित हिंदूंचे' मुख्यमंत्री आहेत, तर असे न करता त्यांनी सर्वसमावेशक मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे ते होळी आणि दिवाळी साजरी करतात, त्याप्रमाणे त्यांनी ईदही साजरी करावी. केवळ हिंदूंचे सण साजरे करून इतर धर्माच्या सणांनाही प्राधान्य मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे.

- राम गोविंद चौधरी

लखनौ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना आदित्यनाथ म्हणाले की, "मी ईद साजरी करत नाही, मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा. घरी जानवे घालून बसायचे व बाहेर आल्यावर टोपी घालून फिरायचे असे ढोंग भाजप सरकार करत नाही." या सोबतच ज्यांना ईद शांततेत साजरी करायची आहे त्यांना राज्यसरकार सर्व मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

Ram Govinda Chaudhari

हिंदू असल्याचा अभिमान असणे यात काही गैर नाही. राज्यपालांच्या भाषणावर प्रतिक्रीया देताना त्यांनी आधीच्या सरकारवर टीका करत सांगितले की, आधीच्या सरकारच्या काळात विद्यार्थ्यांना 'ग से गधा' असे शिकवले जात होते, पण आमच्या सरकारच्या काळात यात बदल करून 'ग से गणेशा' असे विद्यार्थ्यांना शिकवले जाईल. 

त्यांनी विरोधी पक्षांना सांगितले की, ज्याप्रमाणे त्रिपुरामध्ये आम्ही 'लाल ध्वज' खाली आणला आहे. त्याप्रमाणे उत्तर प्रदेशात 'लाल टोपी' जी समाजवादी पक्षाची ओळख आहे, ती नाहीशी करू व भगवा आणू. 

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आभार व्यक्त करताना चौधरी म्हणाले की, 'सध्याचे सरकार हे दलित, मागासवर्गीय व मुस्लिम यांच्या अपेक्षांसोबत खेळत आहेत.' त्याचबरोबर त्यांनी असाही आरोप केला की, योगी आदित्यनाथ हे केवळ 'तथाकथित हिंदूंचे' मुख्यमंत्री आहेत, तर असे न करता त्यांनी सर्वसमावेशक मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे ते होळी आणि दिवाळी साजरी करतात, त्याप्रमाणे त्यांनी ईदही साजरी करावी. केवळ हिंदूंचे सण साजरे करून इतर धर्माच्या सणांनाही प्राधान्य मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे. असे मत चौधरी यांनी व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news uttar pradesh news yogi aditya nath hindu muslim eid