जिओला लागणार फी तर व्होडाफोन मात्र फ्री..

तुषार रूपनवर 
Thursday, 10 October 2019

  • जिओला lलागणार फी तर व्होडाफोन मात्र फ्री
  • व्होडाफोनचा जिओला जोरदार धक्का
  • अनलिमिटेड कॉलिंग सेवा फ्री राहणार 

रिलायन्स जिओनं यापुढे इतर मोबाईल कंपन्यांना कॉल केल्यास सशुल्क सेवा देण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी रिलायन्सनं हा निर्णय घेतला. तर दुसरीकडे व्होडाफोननं मात्र आपली अनलिमिटेड कॉल सेवा फ्रीच राहिल अशी घोषणा केलीय. व्होडाफोन आणि आयडियावरून इतर कोणत्याही मोबाईल नेटवर्क कंपनीच्या ग्राहकाला कॉल केल्यास पैसे आकारले जाणार नाहीत असं कंपनीनं स्पष्ट केलंय. व्होडाफोनचा हा निर्णय रिलायन्स जिओसाठी मोठा धक्का मानला जातो.

व्होडाफोनच्या व्यवस्थापनाने आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय  

 

 

व्होडाफोन आणि आयडिया कंपनी आपल्या ग्राहकांवर कोणताही आर्थिक भुर्दंड लादू इच्छित नाही. आम्ही जे आश्वासन ग्राहकांना दिलं होतं ते पाळलंय. ग्राहकांनो आमच्या सेवेचा आनंद घ्या.. 
 

थोडक्यात काय तर व्होडाफोन-आयडियानं आपल्या ट्विटमधून जिओला सणसणीत चपराकच लगावलीय. 

सुरूवातीच्या काळात जिओनं फ्री सेवा देऊन आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना चांगलाच घाम फोडला. मात्र आता जिओलाच घाम फुटलाय. नुकसान होत असल्याचं कारण देत जिओनं अन्य नेटवर्कला कॉल केल्यानंतर प्रति मिनिट 6 पैसे आकारण्याचा निर्णय घेतलाय. पण दुसरीकडे व्होडाफोन-आयडिया मात्र आपल्या फ्री कॉलिंगवर ठाम आहेत. व्होडाफोनची आयडियाची कल्पना पाहिल्यानंतर आता सगळ्या ग्राहकांना व्हॉट अँन आयडिया सरजी असंच म्हणावसं वाटत असेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news vodafone to continue their free service to compete with jio