लग्नात आलेल्या भेटवस्तूचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 मार्च 2018

ओडिशा - लग्नात आलेल्या भेटवस्तूचा स्फोट झाल्याने एका नवविवाहित तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. या स्फोटात तरुणाच्या आजीचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सौम्य साहू असे या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सौम्य आणि रिमा यांचा विवाह झाला होता. लग्नात आहेर म्हणून आलेल्या भेटवस्तू उघडून पाहत असताना त्यातल्या एका भेटवस्तूचा स्फोट झाला. यावेळी सौम्य, त्याची पत्नी रिमा आणि आजी गंभीर जखमी झाले. या तिघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु, उपचारादरम्यान सौम्य आणि त्याच्या आजीचा मृत्यू झाला असून, रिमावर उपचार सुरू आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या निधनामुळे रिमा अजूनही धक्क्यात आहे. झालेल्या स्फोटामुळे ती 40 टक्के भाजली असून, तिच्या शरीराच्या डाव्या बाजूलाही गंभीर दुखापत झाली आहे. रिमाच्या आईवडिलांनाही याचा जबरदस्त धक्क बसल्याचे रिमाच्या नातेवाईकांनी सांगितले.

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. भेटवस्तूमध्ये कदाचित स्फोटके पाठवली असल्याचा संयश पोलिसांनी व्यक्त केला आहे. 23 फेब्रुवारीला ही भेटवस्तू सौम्यच्या घरी कुरिअरद्वारे पाठण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: marathi news Wedding gift explosion killed husband

टॅग्स