प. बंगाल उद्योगांचे नवे ठिकाण : ममता 

श्‍यामल रॉय
बुधवार, 17 जानेवारी 2018

कोलकता : पश्‍चिम बंगाल हे उद्योगक्षेत्रासाठी देशातील नवे ठिकाण असून आमच्या राज्यातील गुंतवणुकीचा शेजारी राज्यांना देखील लाभ होईल असा दावा करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज 'बंगाल बिझिनेस समीट-2018' मध्ये देशभरातील उद्योजकांना आपल्या राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये उद्योग केंद्रीत झाल्याने तेथे त्यांची मोठी गर्दी झालेली पहायला मिळते असेही त्यांनी नमूद केले. 

या उद्योग संमेलनात मुकेश अंबानी, एल.एन.मित्तल, सज्जन जिंदाल, उदय कोटक, किशोर बियाणी, संजीव गोयंका आदी दिग्गज उद्योगपतींसोबत विविध देशांची शिष्टमंडळे देखील सहभागी झाली आहेत. नऊ देश या संमेलनाचे भागिदार बनले असून त्यामध्ये चीन, पोलंड, दक्षिण कोरिया, इटली आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. 

एकही संप नाही 
सहा वर्षांमध्ये आमच्या सरकारने एकही संप होऊ दिला नसून उद्योगांना त्रास देणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांनाही आम्ही माफ केलेले नाही. आम्ही उद्योगावर प्रेम करतो कारण तीच आमची संपत्ती आहे. सामाजिक आणि भौतिक पातळीवर आम्ही पायाभूत सुविधा उभारत आहोत असे ममता यांनी सांगितले. 'जेएसडब्लू स्टील'चे सज्जन जिंदाल यांनी यावेळी राज्य सरकारच्या परिश्रमाचे कौतुक केले. 

'रिलायन्स जिओ' डिसेंबर 2018 पर्यंत पश्‍चिम बंगालमधील सर्वच खेड्यांमध्ये पोचेल. मागील दोन वर्षांत आमच्या कंपनीने पंधरा हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून पुढील तीन वर्षांमध्ये जिओ व्यतिरिक्त उद्योगांत आम्ही पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास कटीबद्ध आहोत. 
मुकेश अंबानी, उद्योगपती

Web Title: marathi news West Bengal Mamata Banerjee Investment